Breaking News

जड-अवजड वाहनांवर पोलिसांची कारवाई

पनवेल : वार्ताहर – मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर खालापूर टोलनाका येथे विशेष मोहीम सेफ्टी ऑन हायवेज या मोहिमेंतर्गत जड-अवजड वाहनांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये प्रवासी बसेस, जड-अवजड वाहनांनी डाव्या मार्गिकेचा वापर करावा, जी अवजड वाहने मधल्या किंवा पहिल्या मार्गिकेमधुन जात असल्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. तसेच वेगाने जाणार्‍या लहान वाहनांना डाव्या बाजुने ओव्हरटेकींग करावी लागते. त्यामुळे अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉटर नेमण्यात आलेले आहेत व त्यांचा एक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार करण्यात आलेला आहे. तसेच कॅचर म्हणुन खालापुर टोल नाका याठिकाणी पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांना नेमण्यात आलेले आहेत. या स्पॉटरने लेन कटींग केलेल्या अवजड वाहनांचे क्रमांक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वरती टाकण्यात आल्यानंतर खालापूर टोल नाका याठिकाणी कॅचर म्हणुन नेमलेले पोलीस अधिकारी/अंमलदार या अवजड वाहनांना ताब्यात घेतात. अवजड वाहनाच्या वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यात येते व त्याबाबत वाहन मालकांना समजदेखील फोनद्वारे दिली जाते.

याव्यतिरिक्त महामार्गावरील हॉटेल्स, ढाबे, मॉल्स तसेच मोठे ट्रान्सपोर्ट व लॉजिस्टीक याठिकाणी सकाळी व सायंकाळी वाहनांमधील पीए सिस्टीम द्वारे वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन तसेच वाहने बेदरकारपणे व बेशिस्तपणे न चालविण्याबाबत घोषणा दिल्या जातात. महाराष्ट्र राज्य मुंबईचे अप्पर पोलीस महासंचालक (वाहतुक) भुषणकुमार उपाध्याय यांनी या मोहिमेत मार्गदर्शन करुन सुचना दिल्या. या मोहिमेकरिता सहाय्यक निरीक्षक शेवाळे, गौरी मोरे, उपनिरीक्षक मोरे, केसरकर हे चार पोलीस अधिकारी व 56 पोलीस अंमलदार आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे 30 कर्मचारी हे 24 तास ऑपरेशन सेफ्टी ऑन हायवेज ही मोहीम राबविण्यात येत आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply