Breaking News

भाजप जिल्हा कार्यालयाचे सोमवारी भूमिपूजन आणि पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सोहळा

पनवेल : रामप्रहर वृत्त
भारतीय जनता पक्षाच्या नव्याने उभारण्यात येणार्‍या उत्तर रायगड जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन तसेच नूतनीकरण केलेल्या पनवेल मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन सोमवार (दि. 28) राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
उत्तर रायगड जिल्हा भाजपचे कार्यालय पनवेल तालुक्यातील डेरवली येथे उभारण्यात येणार असून त्याचे भूमिपूजन सकाळी 9.30 वाजता करण्यात येणार आहे, तर पनवेल शहरात रूपाली सिनेमागृहाजवळ असलेल्या मध्यवर्ती कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले असून त्याचे लोकार्पण सकाळी 10. 30 वाजता होणार आहे.
या कार्यक्रमास पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, पनवेल तालुका मंडल अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर मंडल अध्यक्ष जयंत पगडे, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल, उरण मंडल अध्यक्ष रवी भोईर, खालापूर मंडल अध्यक्ष रामदास ठोंबरे, कर्जत मंडल अध्यक्ष मंगेश म्हसकर, खोपोली मंडल अध्यक्ष रमेश रेटरेकर यांनी केले आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply