Breaking News

रायगड मुख्याध्यापक संघ अध्यक्षपदी भगवान माळी

कळंबोली : प्रतिनिधी – रायगड जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नवीन पनवेल येथील के. आ. बांठीया विद्यालयात झाली. यामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य भगवान शिवदास माळी यांची रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.

रायगड जिल्ह्यात जवळपास 800 माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. या विद्यालयांचे विविध प्रश्न शासन दरबारी प्रलंबित असतात. शासनाशी विचारविनिमय करण्यासाठी कृतिशील असा रायगड जिल्हा मुख्याध्यापक संघ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षांना विविध शाळांतील मुख्याध्यापकांकडून सर्वानुमते नियुक्त केले जाते.

यामध्ये अध्यक्षपदी भगवान माळी, उपाध्यक्षपदी काशिनाथ गोरीवले, सचिवपदी अरुण उत्तेकर, सहकार्यवाहपदी विष्णू मगर, प्रसिद्धिप्रमुख राजेंद्र पवार, तर हिशेब तपासणीसपदी रमेश भीलके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply