Tuesday , March 28 2023
Breaking News

रायगड लोकसभा मतदारसंघात युवकांची मते निर्णायक ठरणार

पेण : प्रतिनिधी

रायगड लोकसभा मतदारसंघात 22 लाख 54 हजार 222 मतदार असून, त्यापैकी 35 हजार 452 नवमतदार आहेत. हे युवा मतदार रायगड लोकसभा मतदारसंघात निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना या नवमतदारांना आपल्याकडे वळविण्यासाठी विषेश परिश्रम करावे लागणार आहेत. मतदारसंघाची एकूण लोकसंख्या 31 लाख 73 हजार 358 असून त्यामधील 18 वर्षावरील मतदारांची संख्या 22 लाख 54 हजार 222 आहे. यामध्ये 18 ते 39 या  वयोगटांतील 1 लाख 12 हजार 753 युवा मतदार आहेत. त्यातील 35 हजार 452 नवमतदार असून, ते 17व्या लोकसभा निवडणुकीत प्रथमच मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वाधिक 5 लाख 10 हजार 370 मतदार हे 30 ते 39 या वयोगटातील आहेत या खालोखाल 20 ते 29 या वयोगटातील मतदार 4 लाख 26 हजार 140 आहेत. या युवा मतदारांना मतदानासाठी जागे करण्यासाठी निवडणूक आयोगाने जिल्हाभरात मोठी जागृतीसुद्धा केली आहे. या मतदारांकडे सर्वांचे लक्ष आहे.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply