Breaking News

सुके लाकूड बनतेय उपजीविकेचे साधन; लाकडाची मोळी विकून कुटूंबाला आधार

मोहोपाडा : प्रतिनिधी

महागाईने कहर केला असून घरखर्चाचे नियोजन करताना गृहिणींना तारेवरची कसरत करावी लागत आहे. स्वयंपाकाचा गॅस महागल्याने अनेक महिलांचा कल सध्या चुलीकडे वळल्याचे दिसून येते. त्यामुळे चुलीसाठी लागणार्‍या सरपणाची ग्रामीण भागात मागणीही वाढली आहे. या गृहिणींना सरपण पुरवण्यासाठी लाकडाची मोळी विकणार्‍या आदिवासी महिला खालापुर तालुक्याच्या परिसरात दिसत असून हेच त्यांच्या रोजगाराचे साधन बनले आहे.

सध्या ओरेंज झोन आणि ग्रीन झोन येथे काही व्यवसाय सुरु झाल्यामुळे गेले अनेक दिवस  घरीच असल्यामुळे शिवाय हाताला काम नसल्याने जंगलात असलेले लाकडे हेच त्यांचे उपजिवीकेचे साधन निर्माण झाले आहे. महागाईमुळे गॅस परवडत नसल्याने तसेच चुलीवर शिजवलेल्या जेवणाची लज्जत औरच असते शिवाय घराचे बजेट जुळवण्यासाठी या परिसरात अनेक घरांमध्ये चुलींवर स्वयंपाक होताना दिसत आहे. त्यामुळे स्वयंपाक करण्यासाठी सुक्या लाकडाचा वापर करीत असल्याने, आदिवासी समाज यांना रोजगार मिळत आहे.                                  

या सुकलेल्या लाकडांची मोळी 100 ते 150 रूपयांपर्यंत विकत असून आपला उदरनिर्वाह करीत आहेत. लाकडे विकून आदिवासी महिलांना वर्षातील आठ महिने रोजगार मिळत असतानाच महागाईने त्रस्त झालेल्या गृहिणींना यामुळे दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. तसेच महिन्याचे कोलमडलेले बजेट सांभाळताना करावी लागणारी तारेवरची कसरतही यामुळे कमी

होत आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply