ग्रामपंचायत निवडणूक
रोहे : प्रतिनिधी
तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक येत्या 15जानेवारीला होत असून, सदस्य पदाच्या एकूण 191जागांसाठी 598 अर्ज वैध ठरले आहेत.
रोहा तालुक्यातील रोठ बुद्रुक, वरसे, रोठ खुर्द, तळाघर, घोसाळे, शेणवई, खांब, गोवे, चिंचवली तर्फे दिवाळी, तिसे, महाळुंगे, शेडसई, निडी तर्फे अष्टमी, वावे पोटगे, कोंडगाव, वरवटणे, वाशी, ऐनघर, मालसई, पळस आणि धामणसई या 21 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. तेथे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत 30डिसेंबरपर्यंत होती. या मुदतीत 607 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. 31 डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी झाली. त्यात 9अर्ज बाद झाले. त्यामुळे 21 ग्रामपंचायतीमधील 68 प्रभागांतील सदस्य पदाच्या 191जागांसाठी 598 अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज मागे घेण्याची अंतीम तारीख 4 जानेवारी असून, त्यानंतरच निवडणूकीचे चित्र स्पष्ट होईल.
ऐनघरमध्ये सर्वाधी उमेदवारी अर्ज
रोहा तालुक्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये वैध ठरले आहेत. तेथे 15 जागासाठी 68उमेदवारी अर्ज वैध ठरले. त्याखालोखाल शेणवई ग्रामपंचायतीमध्ये नऊ जागांसाठी 41 उमेदवारी अर्ज वैध ठरले. सर्वात कमी चिंचवली तर्फे दिवाळी ग्रामपंचायतीमध्ये सात जागांसाठी 14 उमेदवारी अर्ज तर शेडसई ग्रामपंचायतीमध्ये सात जागंसाठी 16 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.
ग्रामपंचायत सदस्य संख्या वैध अर्ज
रोठ बुद्रुक 7 30
वरसे 17 28
रोठ खुर्द 9 27
तळाघर 9 28
घोसाळे 9 30
शेणवई 9 40
खांब 9 21
गोवे 9 22
चिंचवली तर्फे 7 14
दिवाळी
तिसे 9 29
महाळुंगे 7 27
शेडसई 7 16
निडि तर्फे 9 38
अष्टमी
वावे पोटगे 7 23
कोंडगाव 9 29
वरवटणे 9 23
वाशी 9 22
ऐनघर 15 67
मालसई 9 31
पळस 9 34
धामणसई 7 19