Breaking News

गव्हाण येथे रक्षाबंधन पर्व उत्साहात साजरे

गव्हाण : रामप्रहर वृत्त

पनवेल तालुक्यात भाजपतर्फे रक्षाबंधन पर्व मोठ्या उत्साहात सुरू असून, त्याअंतर्गत गव्हाण पंचायत समिती मतदारसंघातही बुधवारी (दि. 7) या पर्वाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित महिलांनी मुख्यमंत्र्यासाठी एक राखी आणि मनोगत व्यक्त केले. पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी पर्वाबद्दल सर्वांना माहिती दिली. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंत विविध योजना राबविण्यात आल्या. या योजना महिलांना केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आल्या होत्या. यामध्ये उज्ज्वला योजना, घरघंटी, अपंग कल्याण निधी, संसारोपयोगी साहित्य वाटप, विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आले होते. राज्य सरकारकडून निधी उपलब्ध झाल्यामुळे या योजना यशस्वीपणे राबविता आल्या, असे रत्नप्रभा घरत या वेळी म्हणाल्या. त्याचप्रमाणे पनवेल तालुक्यातून साडेपाच हजार राख्या पाठवायच्या असून, यापुढेही आम्हाला हेच मुख्यमंत्री मिळोत, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. या वेळी गव्हाणच्या सरपंच हेमलता भगत, ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, माजी ग्रामपंचायत सदस्य जयश्री कोळी, ग्रामपंचायत सदस्य गिरिजाबाई कातकरी, शासकीय योजनांचा लाभ घेतलेल्या सर्व आदिवासी महिला, भगिनी व शेलघर ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply