पनवेल ः रामप्रहर वृत्त
महाडच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला. त्यामुळे आव्हाड यांचा सर्वत्र निषेध होत आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने गुरुवारी (दि. 30) आव्हाडांविरोधात पनवेलमध्येही जोरदार आंदोलन करण्यात आले. या वेळी आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष अनिल भगत, कामगार नेते जितेंद्र घरत, अनुसूचित जाती मोर्चाचे अरुण सोळंकी, विनायक मुंबईकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष सुमित झुंझारराव, अविनाश गायकवाड, अनंता गायकवाड, श्याम साळवी, मयूर कदम, रावसाहेब खरात, मधुकर उरणकर, अमोल जाधव, कोषाध्यक्ष शोभा मिठबावकर, चित्रा भंडारी, सदस्य संजय कांबळे, आनंद जाधव, संतोष म्हस्के, चंद्रकांत सोनवणे, सुरजित टाक, सर्जेराव साळवे, गोपाळ पडे, अनंता वाहुळकर, उमेश कांबळे, आत्रम, गणेश जाधव, देवद ग्रामपंचायतीचे सदस्य बंटी रसाळ, श्री. ढवळे, श्री. तायडे, विष्णू गायकवाड, चेतन कांबळे, यांच्यासह भीम अनुयायी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या महाड आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. महाडच्या आंदोलनाचे वेळी आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृती असे लिहिलेले फोटो आणले होते. मनुस्मृती फाडण्याचे आंदोलन करत असताना आव्हाड व त्यांच्या कार्यकर्त्यांनी डॉ. आंबेडकरांचे फोटो फाडले. त्यामुळे भीम अनुयायींकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. त्या अनुषंगाने आव्हाड यांच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात तसेच पुण्यातील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल झाला आहे.
स्टंटबाजीच्या नादात आव्हाडांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून अपमान केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी जोरदार मागणी पनवेल येथील निषेध आंदोलनातून करण्यात आली.
Check Also
Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen
Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …
RamPrahar – The Panvel Daily Paper