Breaking News

फी न भरल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद

खोपोलीतील प्रकार; पालकांची शिक्षणाधिकार्‍यांकडे धाव

खालापूर : प्रतिनिधी
खोपोलीतील वसंत मेमोरियल स्कूलच्या इयत्ता सहावीतील 38 विद्यार्थ्यांना फी न भरल्याने शाळेने ऑनलाइन शिक्षण देणे बंद केले आहे. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी खालापूर पंचायत समितीचे प्रभारी शिक्षणाधिकारी भाऊसाहेब पोळ यांच्याकडे धाव घेत तक्रार केली आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी शैक्षणिक संस्थेला ऑनलाइन शिक्षण देण्याचे आदेश द्यावेत तसेच थकीत वार्षिक फी टप्प्याटप्प्याने भरण्याची सवलत देण्यात यावी, अशी मागणी पालकांनी या वेळी प्रभारी शिक्षणाधिकारी पोळ यांच्याकडे केली. यावर पोळ यांनी शिक्षण संस्थेला विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नाही यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्याचे आदेश भ्रमणध्वनीवरून दिले.  
दरम्यान, वसंत मेमोरियल स्कूलचे व्यवस्थापक उल्हासराव देशमुख यांनी विद्यालय चालविताना मोठे आर्थिक संकट उभे ठाकले असून, पालकांनी सहकार्य करावे. आर्थिक संकटावर मात करण्यासाठी विविध उपाय योजले जात आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी पालकांचे म्हणणे ऐकून मार्ग काढू, असे सांगितले.

Check Also

पनवेलमध्ये शेकाप कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल ः रामप्रहर वृत्त आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पनवेल तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला गळती लागली …

Leave a Reply