तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी केले स्वागत
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यात होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार्यांचा ओघ कायम आहे. त्याअंतर्गत शेकाप व काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. भाजप पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी पक्षाची शाल देऊन या पदाधिकार्यांचे पक्षात स्वागत केले.
भारतीय जनता पक्षाच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेशामध्ये शेकापचे गुळसुंदे विभागीय उपाध्यक्ष तथा सावळेचे लाल ब्रिगेड अध्यक्ष सतीश म्हसकर, काँग्रेसचे संदीप केदारी, शेकापचे अंकुश झिंगे, अंकुश म्हसकर, नितीन म्हसकर यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. या पक्ष प्रवेशामुळे ग्रामीण भागात भाजपची ताकद आणखीणच वाढली आहे.
या पक्ष प्रवेश सोहळ्या वेळी गुळसुंदे पंचायत समिती अध्यक्ष सुनील माळी, माजी सरपंच अविनाश गाताडे, शिवाजी माळी, संतोष माळी, रामचंद्र केदारी, किरण केदारी, सचिन केदारी, भालचंद्र म्हस्कर, राम गाताडे, हभप काशीराम महाराज कर्णेकर, कमलाकर माळी आदी भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
तसेच या वेळी शेकापमधून भाजपमध्ये आलेले सतीश म्हस्कर यांची भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते म्हस्कर यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.