Breaking News

‘सावित्रीबाई फुलेंमुळेच स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला’

पनवेल : प्रतिनिधी

स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वेचणार्‍या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच आज अनेक क्षेत्रात स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी केले. रविवारी (दि. 3) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते मनोगत व्यक्त करीत होते.

महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयात रविवारी सकाळी 10 वाजता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेला अ‍ॅड. प्रीती भुजबळ यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

या वेळी नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांच्यासह पनवेल नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुभाष भुजबळ, हेमंत भुजबळ, सुकापूर ग्रामपंचायत प्रभाग 2 चे उमेदवार दिवेश भगत, प्रभाग अध्यक्ष विजय म्हात्रे, शक्ती केंद्र प्रमुख प्रशांत फुलपगार, अनंत जाधव, राकेश भुजबळ, अरुण भुजबळ, संतोष भुजबळ, अ‍ॅड. किशोर धाकड, किशोर शिंदे, नितीन भुजबळ आणि अजित लोंढे उपस्थित होते.

या वेळी अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या उध्दारासाठी आयुष्य वेचले. त्यासाठी त्यांनी अनेक यातना, हेटाळणी, हल्ले सहन केले. त्यामुळेच आज स्त्रियांनी अनेक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवलेला पाहायला मिळत आहे. यासाठी आपल्याला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यापुढे नतमस्तक व्हावे लागेल, असे सांगितले.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply