Breaking News

मंत्री धनंजय मुंडेंविरोधात बलात्काराची तक्रार

तरुणीची पोलिसांत धाव

मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने केला असून, ओशिवरा पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे, मात्र याबाबत कारवाई झाली नसल्याचे पीडितेचे म्हणणे आहे.
माझ्यावर 2006पासून अत्याचार सुरू होते. पुढे बॉलीवूडमध्ये चांगली संधी मिळवून देण्याच्या नावाखाली इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप पीडित तरुणीने तक्रारीत केला आहे तसेच याचे व्हिडीओ काढून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद केले आहे.
पोलिसांनी दखल न घेतल्याने पीडित तरुणीने याबाबत मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीट करीत ही माहिती दिली. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्वीट करीत मदतीची साद घातली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply