Breaking News

पनवेलच्या मिडलक्लास सोसायटी मैदानात लॉन टेनिस व बॅडमिंटन कोर्ट

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी उपक्रम राबविणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने शहरातील मिडलक्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात लॉन टेनिस व बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले असून, त्याचे लोकार्पण भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. 12) करण्यात आले.
या कार्यक्रमाला महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर, प्रसिद्ध नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर, नगरसेवक अनिल भगत, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, उद्योजक राजू गुप्ते, किरण मनोरे, मनोहर मुंबईकर, सोसायटी मित्र मंडळाचे अध्यक्ष सुमित झुंझारराव, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.  श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाच्या माध्यमातून गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमध्ये समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. मंडळाच्या माध्यमातून कलाकार, विद्यार्थी, तसेच खेळ आणि खेळाडूंना नेहमीच प्रोत्साहन दिले जाते. त्याच अनुषंगाने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सौजन्याने शहरातील मिडल क्लास हौसिंग सोसायटीच्या मैदानात बॅडमिंटन व लॉन टेनिस कोर्ट उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Check Also

नमो चषक स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात; लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल ः रामप्रहर वृत्तलोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने उलवे नोडमध्ये 23 ते 25 जानेवारीपर्यंत …

Leave a Reply