पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिकेच्या माध्यमातून पनवेल शहरामध्ये विकासाची अनेक कामे सुुरू आहेत. या कामांची सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांसह गुरुवारी (दि. 14) पाहणी केली. या वेळी त्यांनी अधिकार्यांना आवश्यक त्या सूचनाही केल्या. पनवेल शहरातील सावकर चौक येथे रस्ते दुरुस्ती आणि रुंदीकरण तसेच वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. या विकासकामांची महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी अधिकार्यांसह पाहणी करून त्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. या पाहणी वेळी नगरसेवक नितीन पाटील, नगरसेविका रूचिता लोंढे, मनपा शहर अभियंता संजय कटेकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, उमेश इनामदार, प्रसाद हनुमंते, सुधीर साळुंखे आदी उपस्थित होते.