Breaking News

कुटुंबातील मृत सदस्याच्या जागी विवाहित मुलीलाही नोकरीचा अधिकार

अलाहाबाद : वृत्तसंस्था

अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय देताना मुलाप्रमाणे मुलीलाही कुटुंबातील कोणत्याही सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जागी नोकरीचा समान हक्क देण्यात यावा, असे म्हटले आहे. विशेष म्हणजे मुलगी अविवाहित असली किंवा विवाहित असली तरी तिला हा हक्क दिला गेला पाहिजे, असेही न्यायालयाने नमूद केले. उच्च न्यायालयाने मृत अवलंबित कोर्टाच्या नियमांमध्ये अविवाहित या शब्दाला केवळ पुरुषांसाठी गृहित धरणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. या शब्दाची व्यख्या व्यक्ती स्त्री आहे की पुरुष याच्या आधारे करण्यात येऊ नये असे म्हणत न्यायालयाने असा भेदभाव करणे कायद्याला धरून नसल्याचे निरीक्षण नोंदविले. न्यायमूर्ती जे. जे. मुनीर यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीमध्ये मुलीलाही समान हक्क देण्यात यावा, असे म्हटले. यासाठी नियमामध्ये बदल करण्याची गरज नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मंजुल श्रीवास्तव असे अर्ज करणार्‍या महिलेचे नाव असून, त्यांनी आपल्या आईच्या जागी नोकरीसाठी अर्ज केला होता. मंजुल यांची आई विमला श्रीवास्तव चाका येथील प्राथमिक विद्यालयामध्ये शिक्षिका होत्या. हृदयविकाराने विमला यांचा मृत्यू झाला. विमला यांचे पती आणि माझे वडील बेरोजगार असल्याने कुटुंबावर आर्थिक संकट आले असून, मला नोकरी देण्यात यावी असा अर्ज मंजुल यांनी केला होता. हा अर्ज फेटाळून लावण्यात आल्यानंतर प्रकरण न्यायालयात गेले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून मराठी अर्थशास्त्र परिषदेला 20 लाखांची देणगी

पनवेल : रामप्रहर वृत्त समाजाच्या हितासाठी अखंडपणे सामाजिक कार्य करणारे आणि कायम सामाजिक बांधिलकी जपणारे …

Leave a Reply