पनवेल : वार्ताहर
पनवेल जवळील जुना पुणे-मुंबई महामार्गावरील मनोज ढाब्यासमोर भिंगारवाडी येथे शनिवारी (दि. 16) सकाळी 7.30 च्या सुमारास टेम्पो, ट्रेलर व मोटरसायकल यांच्यात झालेल्या अपघातात एक ठार तर पाच जखमी झाले आहेत.
मोटार सायकलवरील फिर्यादी एडविन लुईस फर्नांडीस (20 रा. बांद्रा) हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकल घेऊन जुना पुणे-मुंबई महामार्गाने पुण्याच्या दिशेने जात होता. या वेळी भिंगारवाडी गावाच्या पुढे मनोज ढाब्याच्या समोर तो आला असताना ट्रेलर (क्र.एमएच-46-एएफ-3556) वरील चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रेलर नादुरुस्त असल्याने रस्त्यावर उभा केला होता. याचवेळी पाठीमागून येणार्या टेम्पो (क्र.एमएच-12-आरएन-1515) वरील चालक आरोपी बाळू भोंडवे याने त्याच्या ताब्यातील टेम्पो भरधाव वेगाने चालवून ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी टेम्पोचालक स्वतः तसेच तुळशीराम भोला गडदिया, बळीराम किलील कनोजिया, ओमप्रकाश कनोजिया, अल्मालिक रमजान राजनपूरा हे जखमी झाले. या अपघातात बेचन प्रसाद मनोजिया (वय 55) यांचा गंभीररित्या जखमी होवून मृत्यू झाला आहे. हे सर्व टेम्पोतील प्रवासी आहेत. या अपघाताची नोंद पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील कारोटे करीत आहेत.