Breaking News

बर्ड फ्लूमुळे मटण, मासळीला पसंती; चिकनकडे ग्राहकांची पाठ

सुधागड : रामप्रहर वृत्त

बर्ड फ्लूच्या धास्तीने ग्राहकांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे ऐन हंगामात चिकन विक्रेते हवालदिल झाले आहेत, तर दुसरीकडे मटण, मासळी विक्रेत्यांना सुगीचे दिवस  आले आहेत. बर्ड फ्लूचा फैलाव राज्यातही झाला असून, त्याची लागण कोंबड्यांना सर्वाधिक झाल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे चिकन विक्रेत्यांवर संक्रांत आली आहे. याबाबत पालीतील चिकन विक्रेते संतोष देशमुख यांनी सांगितले की, कोरोना काळात आमचे प्रचंड नुकसान झाले. मग मार्गशीर्ष महिना आला. त्यानंतर आता कुठे हंगामाला खर्‍या अर्थाने सुरुवात झाली होती. दरवर्षी किंक्रांतीला खूप माल संपतो. त्यामुळे सर्व तयारी करून ठेवली होती, मात्र दिवसभरात एकही कोंबडी विकली गेली नाही. त्यामुळे आता काय करावे, हा प्रश्न आहे. आम्ही सर्व प्रकारची खबरदारी घेत आहोत, पण बर्ड फ्लूच्या भीतीने कोणीही चिकन विकत घेत नाही. बर्ड फ्लूमुळे चिकन खाणारी मंडळी आता मटण व मासळी खरेदी करीत आहेत. फिरोज तांबे या मटण विक्रेत्याने सांगितले की, मटण खरेदीसाठी आता अधिक लोक येताहेत. मटणाचे भाव वाढविले नाहीत, पण जिल्ह्यात दरात तफावत आहे, तर सिराज खानदेशी या मासळी विक्रेत्याने सांगितले की, पक्ष्यांवर रोग आल्याने चिकनचे गिर्‍हाईक आता मासळीकडे वळले आहेत. त्यामुळे चांगला धंदा होतो, मात्र मागणी अधिक असूनही त्या प्रमाणात समुद्रात मासे मिळत नसल्याने भाव वाढलेत. परशुराम लेंडी या आणखी एका मासळी विक्रेत्याने सांगितले की, बंदरावर टोपलीने घाऊक मिळणारी काही मासळी आता वजनावर दिली जात आहे.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply