पनवेल : रामप्रहर वृत्त
दैनिक बित्तंबातमी रायगड आवृत्तीचा प्रकाश समारंभ शुक्रवारी (दि. 17) सायंकाळी पाच वाजता पनवेल मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला आहे.
या दैनिकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते होणार आहे, तर प्रमुख उपस्थिती आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, महापौर कविता चौतमोल यांची लाभणार आहे. या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन संपादक व प्रकाशक विनायक शं. (अनिकेत) जोशी, कार्यकारी संपादक रवींद्र आवटी, आवृत्ती प्रमुख अशोक गायकवाड यांनी केले आहे.