Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या स्वखर्चाने पुनाडे येथे विकास कामे

उद्घाटनावेळी ग्रामस्थांनी मानले आभार

उरण : वार्ताहर

उरण तालुक्यातील पुनाडे आदिवासी येथे पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन व मोटारचे काम आमदार महेश बालदी यांच्या स्वखर्चाने पूर्ण झाले आहे. या कामाचे उद्घाटन भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांच्या हस्ते रविवारी (दि. 17) झाले.

या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, उरण पूर्व विभाग अध्यक्ष शशी पाटील, चिरनेर पंचायत समिती विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील, आवरा पंचायत समिती उपाध्यक्ष वृषाली पाटील, खोपटे गावचे सरपंच विशाखा ठाकूर, कोप्रोली गावचे माजी सदस्य सचिन गावंड, युवा नेते प्रितम म्हात्रे, आवरे ग्रामपंचायत सदस्य चेतन पाटील, पुनाडे गावचे बुथ अध्यक्ष संदेश पाटील, गाव अध्यक्ष लवेश पाटील, महादेव पाटील, युवा नेते रसिक पाटील, संदीप ठाकूर, प्रदीप पाटील, राधेश्याम पाटील, नवनीत पाटील, सुमित पाटील, राजेश म्हात्रे आदी उपस्थित होते.

आमदार महेश बालदी यांच्या वतीने आम्ही आदिवासी समाजासोबत ठामपणे उभे राहु नेहमीच सहकार्य करू, असे आश्वासन उद्घाटनाच्या वेळी भाजप उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर यांनी केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply