Breaking News

श्रीवर्धन-दिघी रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य

श्रीवर्धन : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचे पर्यटनस्थळ असल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येन श्रीवर्धन तालुक्यामध्ये फिरण्यासाठी येत असतात. मात्र श्रीवर्धन-शेखाडी- भरटखोल- दिघी या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यातील या प्रमुख रस्त्यावरून प्रवास करताना रस्त्यामध्ये खड्डे की खड्ड्यात रस्ते हे समजत नाही, असे पर्यटक व नागरिकांमधून बोलले जात आहे.

श्रीवर्धन हे पेशव्याचे जन्म ठिकाण आहे, तसेच दक्षिणकाशी म्हणून समजली जाणारे हरिहरेश्वर तीर्थक्षेत्र आहे. तालुक्यातील दिवेआगर येथे प्रसिध्द सुर्वणगणेशाचे मंदिर आहे. तेथून पुढे दिघी व समोर मुरूड जजिंरा किल्ला आहे. स्वच्छ, सुंदर समुद्र किनारा, भ्ाुवनाळे व जिवनेश्वर तलाव, माता सोमजाई देवीचे मंदिर यामुळे श्रीवर्धन तालुक्याला पर्यटक पहिली पसंती देत असतात. मात्र श्रीवर्धन समुद्रकिनार्‍यवरील शेखाडी मार्गे भरटखोलमधील रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था निर्माण झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुच्या साईटपट्ट्या पुर्ण उखडल्या आहेत. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्याने चालकांना वाहन चालविताना तारेवरची करसत करावी लागत आहे. एक खड्डा वाचवायला गेला तर त्याची गाडी दुसर्‍या खड्ड्यामध्ये जाऊन जोरात आपटते. त्यामुळे वाहनामध्ये बसलेल्या प्रवाशांना खुप त्रास सहन करावा लागतो. तसेच वाहनांचेही नुकसान होत असल्याने वाहन मालकांना आर्थिक भ्ाुदर्ंंड सहन करावा लागत आहे. अनेक वेळा गाड्या बंद पडत असल्याने पर्यटकांना दुसर्‍या वाहनाने प्रवास करावा लागतो. त्यामुळे पर्यटक व प्रवासी त्रस्त झाले आहेत.

श्रीवर्धन-शेखाडी- भरटखोल- दिघी रस्त्याची झालेली दुरवस्था लक्षात घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याची त्वरीत डागडुजी करावी, अशी मागणी पर्यटक व आणि स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply