Breaking News

सिंधूवर सायना भारी

राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद पटकावले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

आसाम येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालने पी. व्ही. सिंधूवर विजय मिळवत जेतेपदाला गवसणी घातली आहे.

स्पर्धेच्या अंतिम फेरीत सायनाने सिंधूला 21-18, 21-5 असे पराभूत केले. या स्पर्धेतील सायनाचा हा जेतेपदाचा चौकार ठरला आहे. यापूर्वी तीन वेळा सायनाने राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. अंतिम फेरी चांगलीच चुरशीची झाली, पण यामध्ये अखेर बाजी मारली ती सायनाने. सिंधू आणि सायना यांच्यामध्ये यापूर्वी दोन सामने झाले होते. त्या वेळी सिंधूपेक्षा सायनाच सरस ठरली होती. या वेळीही सायनाने आपणच सिंधूविरुद्ध सरस असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. या स्पर्धेतील सायनाचे हे चौथे जेतेपद आहे. यापूर्वी सायनाने 2006, 2007 आणि 2017 साली जेतेपद पटकावले होते. लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदकाची कमाई केली होती. सिंधूने 2013 साली रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावले होते. राष्ट्रीय स्पर्धेत 2013 साली सिंधूने राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर सिंधूला राष्ट्रीय स्पर्धेचे

जेतेपद पटकावता आले नाही. राष्ट्रीय जेतेपद सिंधूने दोन वेळा पटकावले आहे. राष्ट्रीय स्पर्धेत सायनाने दुसर्‍यांदा सिंधूला पराभूत केले. यापूर्वी 2017च्या राष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम फेरीतही सायनाने सिंधूवर मात केली होती.

— पुरुषांमध्ये सौरभ वर्मा जेता

पुरुषांच्या एकेरी विभागात सौरभ वर्माने सरळ गेम्समध्ये लक्ष्य सेनवर मात करीत जेतेपद पटकावले. सौरभ वर्माने   यापूर्वी 2011 आणि 2017 सालीही राष्ट्रीय स्पधचे जेतेपद पटकावले होते. या वेळी झालेल्या अंतिम फेरीत 17 वर्षीय सौरभने ज्युनिअर आशियाई स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या लक्ष्य सेनला 21-18, 21-13 अशी मात देत अजिंक्यपद पटकावले. पुरुषांच्या दुहेरीमध्ये प्रवण चोप्रा आणि चिराग


शेट्टी यांनी जेतेपद पटकावले. — ही फक्त एक लढत होती. सिंधूनेही चांगली कामगिरी केली. आम्ही दोघींनीही चांगली कामगिरी केली, पण आजचा दिवस सिंधूचा नव्हता. -सायना नेहवाल

Check Also

‘गीतगंधाली’तून उलगडला कर्मवीर अण्णांचा जीवनपट

सातारा येथील कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती सातारा : रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त कर्मवीर …

Leave a Reply