माणगाव : प्रतिनिधी

माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतींच्या सन 2021 ते 2025 करिता सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत गुरुवारी (दि. 21) तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांनी जाहीर केली. माणगाव प्रशासकीय भवन येथील सभागृहात याबाबत तालुक्याच्या उपविभागीय अधिकारी प्रशाली जाधव दिघावकर यांच्या अध्यक्षतेखाली व परी.सहा. जिल्हाधिकारी तथा तहसीलदार माणगाव मैनाक घोष यांच्या उपस्थितीत ही सोडत जाहीर करण्यात आली.
माणगाव तालुक्यातील 74 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आली आहे. अनुसूचित जातीसाठी खुला दोन जागा करंबेळी व पानसई, महिला दोन जागा नांदवी व काकल; अनुसूचित जमातीसाठी खुला चार जागा गांगवली, कोस्ते खुर्द, रातवड, मुठवली, महिला तीन जागा भागाड, निळज, पोटणेर; नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी खुला 10 जागा अम्बर्ले, भाले, गोवेले, होडगाव, पळसप, पाटणूस, कुमशेत, डोंगरोली, शिरसाड, गोरेगाव, महिला 10 जागा मंगरूळ, वावेदिवाळी, पळसगाव बु.,जिते, टोळ खु., तळेगाव तर्फे गोरेगाव, निजामपूर, रवाळजे, लाखपाले, वडगाव; सर्व साधारण आरक्षित जागेसाठी खुला 21 जागा साले, लोणशी, वारक, दहिवली कोंड, साळवे, सुरव तर्फे तळे, पन्हळघर खु., लोणेरे, पन्हळघर बु., पेण तर्फे तळे, साजे, वडवली, खरवली, देवळी, भुवन, मांजरवणे, चिंचवली, नागाव, न्हावे, शिरवली, मोर्बा, महिला 22 जागा सणसवाडी, कडापे, विहूले, दाखणे, हरकोल, देगाव, साई, कवीलवहाल बु., बामणोली, चांदोरे, पुरार, पहेल, वणीमलई कोंड, उणेगाव, दहिवली तर्फे गोवेले, कुंभे, मढेगाव, फलाणी, टेमपाले, वरची वाडी, विळे, तळाशेत अशा प्रकारे ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. सरपंच पदाच्या सोडतीच्या वेळी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते, विविध ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य आदी उपस्थित होते.
पेण : प्रतिनिधी
पेण तालुक्यातील 64 ग्रामपंचायतीच्या 2021 ते 2025 पर्यंतचे सरपंच पदासाठीचे आरक्षण सोडत पद्धतीने करण्यात आले आहे. यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास तहसीलदार अरुणा जाधव, नायब तहसीलदार धनंजय कांबळे, प्रमोद जाधव आदींसह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सरपंच, कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी शालेय विद्यार्थी सुबोध सचिन घरत याच्या हस्ते चिट्ठी काढून आरक्षण सोडतीचे निकाल जाहीर करण्यात आले.
या वेळी झालेल्या सोडत पद्धतीत अनुसुचित जाती महिला राखीव – गागोदे खुर्द, अनुसुचित जमातीमध्ये 14 जागांपैकी सात जागा महिलासाठी राखीव तर सात जागा या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत. यामध्ये महिला राखीव – सापोली, आंबिवली, आंबेघर, शेडाशी, करंबेली, बोरगाव आणि कोपर तर यामधील खुला गट वरवणे, रोडे, जिणें, कामार्ली, पाटणोली, वाशिवली, शिहू या एकुण 14 जागांचा समावेश आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गात महिलांसाठी राखीव आठ जागांमध्ये काराव, दुष्मी, जोहे, कुहीरे, कासू, महलमिर्या डोंगर, दादर, जिते या ग्रामपंचायती असून या प्रवर्गातील खुल्या गटात खारपाले, सावरसई, निधवली, करोटी, झोतिरपाडा, डोलवी, कोप्रोली, कांदळे, कोलेटी या ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
सर्वसाधारण गटात महिलांसाठी 16 राखीव जागा आहेत. यामध्ये जावळी, कणे, खरोशी, निगडे, काळेश्री, दीव,बोर्झे, मूढांणी, वारसई, मलेघर, वडखळ, पाबळ, तरणखोप, बेणसे, बळवली, बोरी ग्रामपंचायतीचा समावेश आहे. तसेच या प्रवर्गात खुला गटात दुरशेत, शिक्री, वाकरुळ, रावे, वाशी, मसदबुद्रुक, वरेडी, आमटेम, सोनखार, उंबर्डे, अंतोरे, वरप, हमरापुर, बेलवडे बुद्रुक, वढाव, कळवेया ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
एकुण 64 ग्रामपंचायतीमध्ये 32 जागांवर महिला आरक्षण तर 32 जागा त्या त्या प्रवर्गातील खुल्या गटासाठी आहेत. शासनाच्या धोरणानुसार 50 टक्के महिलांसाठी राखीव जागा सोडतीमध्ये काढण्यात आल्याने पेण तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतींवर महिलाराज अवतरणार आहे.
उरण येथे आज सोडत
उरण : वार्ताहर
तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींसाठी सन 2020 ते 2025 या कालावधीसाठी सरपंच पदाची सोडत आरक्षण पनवेलचे प्रांत अधिकारी दत्तू नवले यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 22) सकाळी 11 वाजता उरण एजुकेशन हायस्कूल, बोरी पालक मैदान उरण येथे काढण्यात येणार आहे.
हे आरक्षण जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी उरण तालुक्यासाठी निश्चित करून दिले आहे. यामधील पदे अनुसूचित जातीसाठी एक (महिला), अनुसूचित जमाती तीन त्यात खुला एक व महिला दोन, नागरिकांचा मागास प्रवर्ग एकूण नऊ त्यात पाच खुला व चार महिला, सर्व साधारण एकूण 22 त्यापैकी 11 महिला असे आहे, अशी माहिती उरणचे तहसिलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.