Breaking News

आज उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन

पनवेल : रामप्रहर वृत्त

पुन्हा आणूया आपले सरकार, या शीर्षकाखाली रविवारी (दि. 25) सकाळी 10 वाजता खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर भारतीय जनता पक्ष उरण विधानसभा बूथ कार्यकर्ता संमेलन होणार आहे.

या संमेलनास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार प्रवीण दरेकर, माजी आमदार देवेंद्र साटम, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी, उरणच्या नगराध्यक्षा सायली म्हात्रे, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, रामदास ठोंबरे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कल्पना राऊत, पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, पनवेल-उरण विधानसभा विस्तारक अविनाश कोळी आदी उपस्थित राहणार आहेत.

या संमेलनास बूथ पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, शहराध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुकाध्यक्ष बापू घारे यांनी केले आहे.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply