Breaking News

रायगड जिल्ह्यात 566 मपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर

रायगड : रामप्रहर वृत्त

जिल्ह्यातील 809 पैकी 566 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी (दि. 21) जाहीर झाली. सरपंच आरक्षण पदाच्या या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षाचे लक्ष लागून राहिले होते. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर इच्छुक असलेल्या सदस्यांमध्ये कही खुशी कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. हे आरक्षण 2021 ते 2025 पर्यत आरक्षित राहणार आहे.

जिल्ह्यातील 16 तालुक्यापैकी आठ तालुक्यात सरपंच आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. यात अलिबाग 62, पेण 64, पनवेल 71, कर्जत 54, रोहा 64, माणगाव 74, महाड 134, श्रीवर्धन 43 या तालुक्यातील 566 ग्रामपंचायतीचे आरक्षण प्रांताधिकारी यांनी जाहीर केले आहे. 2011 च्या जनगणनेचा विचार करून हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. आजच्या आरक्षण सोडतीत महिला आणि पुरुष यांना समसमान संधी मिळाली आहे. मात्र, ज्यांनी सरपंच पदाचे स्वप्न पाहिले आहे अशा अनेकांचा या आरक्षणामुळे स्वप्नांचा भंग झाला आहे.

Check Also

विमानतळ कार्यरत होण्यापूर्वी दिवंगत लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव देण्याबाबत कार्यवाही करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय …

Leave a Reply