Breaking News

कारखान्यांची सुरक्षा राम भरोसे!; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा महाड येथे आरोप

महाड : प्रतिनिधी

येथील औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांची सुरक्षाव्यवस्था राम भरोसे असून याबाबत उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाड येथील वायुगळती पहाणी दरम्यान सांगितले. या वेळी त्यांनी सुस्त आणि निष्काळजी अधिकार्‍यांची कानउघडणीही केली. करत महाड औद्योगिक वसाहतीतमधील इंडो अमिनेस या कारखान्यात गुरुवारी वायुगळती होऊन सात कामगार जखमी झाले होते. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते  प्रवीण दरेकर यांनी शुक्रवारी या कारखान्याची पहाणी करुन अपघाताची महिती जाणून घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या प्रकरणी आपण कामगार, कारखाना व्यवस्थापक आणि अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांनी कारखाना निरीक्षक आणि प्रदुषण नियंत्रण मंडळांच्या अधिकार्‍यांची कानउघाडणी केली. त्यानंतर दरेकर यांनी महाडमधील डॉ. देशमुख नर्सिंग होममध्ये जाऊन जखमींची चौकशी केली व त्यांना धीर दिला. या वेळी भाजप जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, तालुकाध्यक्ष जयवंत दळवी आदि उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये महिलांसाठी क्रिकेट; स्पर्धा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन

खारघर : रामप्रहर वृत्तखारघरमध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेचे …

Leave a Reply