Breaking News

वरुण-नताशाच्या लग्नाची अलिबागेत धूम

अलिबाग : प्रतिनिधी

बॉलिवूडचा स्टार वरुण धवन आणि त्याची गर्लफ्रेंड नताशा दलाल रविवारी (दि. 24) अलिबागच्या ’द मॅन्शन हाऊस’मध्ये विवाहबद्ध होणार आहेत. शनिवारपासूनच या विवाहसोहळयाचे विधी सुरू झाले.

वरुणचे कुटुंबीय आधीच ’द मॅन्शन हाऊस’मध्ये दाखल झाले असून आता त्याचा बॉलिवूडमधील मित्र परिवार अलिबागमध्ये दाखल होतोय. इथे गर्दी होऊ शकते, ही शक्यता लक्षात घेऊन कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

’द मॅन्शन हाऊस’ एक बीच रिसॉर्ट आहे. ही एक निर्सगरम्य, मनमोहक, जागा आहे. अलिबागच्या सासवणे बीचपासून ’द मॅन्शन हाऊस’ खूपच जवळ आहे. या मॅन्शन हाऊसमध्ये 25 रुम्स आहे. सर्व खोल्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त आहेत. संपूर्ण एक दिवसासाठी ’द मॅन्शन हाऊस’ बुक करण्याचा खर्च चार लाख रुपये आहे. यात जेवणाचा सुद्धा समावेश आहे. वरुणच्या लग्नासाठी खास तीन दिवसांसाठी ’द मॅन्शन हाऊस’ बुक करण्यात आलेय. मुंबईहून स्पीड बोटने ’द मॅन्शन हाऊस’ 20 मिनिटांच्या अंतरावर आहे. मांडवा जेट्टीपासून हे ठिकाण पाच मिनिटांवर आहे.

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply