Breaking News

फुंडे हायस्कूलमध्ये गणवेश आणि मास्कचे मोफत वाटप

उरण : रामप्रहर वृत्त

रयत शिक्षण संस्थेचे तु. ह. वाजेकर उच्च माध्यमिक विद्यालय फुंडे येथे गुरुवारी (दि. 23) गरजू विद्यार्थ्यांना विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि स्थानिक स्कूल कमिटी सदस्य यांच्या गरीब विद्यार्थी निधीतून मोफत गणवेश वाटप करण्यात आले. विद्यालयात प्रवेश घेणार्‍या अभ्यासू आणि गरजू विद्यार्थ्यांना सर्वोतोपरी शैक्षणिक मदत करण्यासाठी दरवर्षी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या माध्यमातून स्वखुशीने निधी जमा केला जातो. त्यातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जाते. चालू शैक्षणिक वर्षात स्कूल कमिटी सदस्यांनीदेखील यात हातभार लावला आणि या सर्वांच्या माध्यमातून विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात आले. विद्यालयाचे चेअरमन कृष्णाजी कडू, प्राचार्य एम. एच. पाटील, पर्यवेक्षक जी. सी. गोडगे, एस. जी. म्हात्रे, ज्युनिअर कॉलेजप्रमुख व्ही. के. कुटे आणि सर्व रयतसेवक यांच्या उपस्थितीत गणवेश व मास्क वाटपाचा कार्यक्रम झाला.इयत्ता पाचवी ते नववीमधील 80 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व मास्कचे वाटप करण्यात आले. सर्व पालक वर्गाकडून  या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली

पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …

Leave a Reply