अलिबाग : प्रतिनिधी
भारताचा 73वा प्रजासत्ताक दिन रायगड जिल्ह्यात बुधवारी (दि. 26) मोठ्या उत्साहात साजरा झाला. पोलीस मुख्यालय, रायगड जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, नगर पंचायत कार्यालये, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. अलिबाग येथील पोलीस कवायत मैदानावर पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा पार पडला. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकांनी राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा नियोजन अधिकारी ज. द. मेहत्रे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील, सुषमा सातपुते, स्नेहा उबाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके, उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे, जिल्हा कृषी अधीक्षक उज्वला बाणखेले आदिंसह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते.
– जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रध्वजास मानवंदना दिली. यावेळी विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी राज्य घटनेच्या उद्देशिकेचे सामुहीक वाचन करण्यात आले. कठीण व खडतर परिस्थितीत चांगली कामगिरी करणारे रसायनी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक धनाजी काळे यांचा दुधे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या वेळी पोलीस अधिकारी, अंमलदार व कर्मचारी हजर होते.
खोपोली : प्रजासत्ताक दिनानिमित्त खालापूर तालुका रा. स्व. संघाने बुधवारी खोपोलीत आयोजित भारतमाता पूजन कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन केले. खोपोली शहरातील दीपक चौकात आयोजित केलेल्या या कार्यक्रमास रा. स्व. संघाचे संपर्क प्रमुख राकेश पाठक, खालापूर तालुका कार्यवाह अविनाश मोरे, शहर कार्यवाह दीपक कुवळेकर, शहर संपर्क प्रमुख सुधाकर भट, खोपोली भाजप अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, युवा मोर्चा शहर अध्यक्ष अजय इंगुळकर,उपाध्यक्ष पुनित तन्ना, महिला मोर्चाच्या स्नेहल सावंत, सुनिती महर्षी, विमल गुप्ते, राष्ट्रसेविका समितीच्या माधवी कुवळेकर, व्यापारी सेलचे कीर्ती ओसवाल, ज्येष्ठ स्वयंसेवक गोखले, पांडे, वामन दिघे यांच्यासह संघ परिवारातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी दीपक कुवळेकर व भाजप कामगार आघाडीचे सूर्यकांत देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. नागरी कृती समितीनेही बुधवारी पहाटे खोपोलीतील श्रीराम मंगल कार्यालयात याच स्वरूपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या वेळी झेंडावंदन करण्यात आले.
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार : तालुक्यात 73 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याच्या निमित्ताने होत असलेले विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते. केवळ एनसीसीच्या विद्यार्थ्यांचे संचलन करण्यात आले. तालुक्यातील प्राथमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांमध्ये कोरोनाच्या सावटाखाली ध्वजारोहण करण्यात आले. कर्जत शहरातील पोलीस मैदानात उपविभागीय अधिकारी अजित नैराळे, पंचायत समितीमध्ये सभापती सुषमा ठाकरे यांनी ध्वजारोहण केले. नगर परिषद कार्यालायातील ध्वजारोहण सोहळा नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. तहसील कार्यालयात तहसीलदार विक्रम देशमुख, कर्जत पोलीस ठाण्यात निरीक्षक सुवर्णा पत्की, उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, न्यायालयात न्या. मनोद तोकले, इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये डॉ. अनिरुद्ध जोशी, अभिनव ज्ञान मंदिर प्रशालेमध्ये संस्थेचे कार्यवाह जनार्दन मोघे, कर्जत महाविद्यालयात प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. विलास पिल्लेवान, राहुल धारकर फार्मसी महाविद्यालयात प्राचार्य डॉ. मोहन काळे, भिसेगावमधील आंबेभवानी माध्यमिक विद्यालयात माजी पंचायत समिती सदस्य पुंडलिक भोईर, वरई ग्रामपंचायतीमध्ये सरपंच सुरेश फराट, शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघात दत्तात्रेय भोईर यांनी ध्वजारोहण केले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सुदाम कार्ले, सहकारी भात गिरणीत अरुण लाड यांनी धवजारोहण केले.
-आगळावेगळा उपक्रम
दाहिवली येथील स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रेय डोंबे विद्या निकेतन विद्यालयात नुकतेच भारतीय सैन्य दलात दाखल झालेला माजी विद्यार्थी बाबू नाईक याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी कार्याध्यक्ष मुकुंद मेंढी, प्रा. नितीन आरेकर, राजेश लाड, रजनी गायकवाड यांच्यासह शिक्षक, ग्रामस्थ व ग्रामस्थ उपस्थित होते.
चौक : विद्या प्रसारिणी सभा चौक या संस्थेच्या सारंग (ता. खालापूर) विद्या मंदिर शाळेत बुधवारी संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. आविनाश देशामुख, उपकार्याध्यक्ष नरेंद्र शहा, सचिव योगेंद्र शहा यांच्यासह शिक्षक, शिक्षेकेत्तर कर्मचारी, माजी विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी शाळेतील विद्यार्थीनी प्रगती ठोंबरे व विद्यार्थी वेदांत ठोंबरे यांनी राष्ट्रभक्तीपर गीते सादर केली.
श्रीवर्धन बीएसएनएल कार्यालयात ध्वजवंदन झालेच नाही!
श्रीवर्धन : प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत संचार निगम (बीएसएनएल) च्या श्रीवर्धन कार्यालयात दरवर्षी ध्वजवंदन केले जाते, मात्र वरिष्ठ अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे यंदा तेथे ध्वजवंदन झाले नाही. बीएसएनएलच्या श्रीवर्धन येथील कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी खांब उभा करण्यात आला आहे. तेथे दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनी ध्वजवंदन केले जाते. मात्र या वेळी तेथे राष्ट्रध्वज फडकविण्यात आला नाही. या कार्यालयाला बुधवारी टाळे लावलेले होते. तेथील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत.
चौक : विद्या प्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्या मंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये बुधवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी आरएसपी शिक्षक कुंभार व विद्यार्थ्यांनी मानवंदना दिली. संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. अविनाश देशमुख, कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख, उपकार्याध्यक्ष नरेंद्र शहा, संचालक कॅ. विठ्ठलराव कदम, सदस्या ऐश्वर्या जोशी, शाळेचे मुख्याध्यापक बादशा भोमले, उपमुख्याध्यापिका कांता पुजारी, पर्यवेक्षक दिलीप मोळीक यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. अनिल बडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.