Breaking News

भोरघाटात रस्ता पुन्हा खचला; धोकादायक एकेरी वाहतूक सुरू

महाड : प्रतिनिधी – महाड पुण्याला जोडणारा वरंध-भोर घाट पुन्हा एकदा खचला असुन, रस्त्याचा अर्धाअधिक भाग दरीत कोसळला आहे. ही घटना भोर तालुका हद्दीत घडली असुन साबा विभागाने एकेरी वाहतूक सुरु ठेवली असली, तरी ती धोकादायक असुन कधीही हा घाट पुर्णपणे दरीत कोसळून बंद होऊ शकतो.

महाड तालुक्याला पुण्याला जोडणारा एकमेव आणि जवळचा मार्ग असलेला भोर घाट सदैव नादुरुस्त राहीला आहे. खराब अरुंद आणि खड्डे कधी दरडी कोसळणे, कधी भल्या मोठ्या दगडी कोसळणे तर गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीमध्ये काही किमीचा घाट पुर्णपणे दरीत कोसळून मार्ग सहा महिने बंद झाला होता. आठ कोटी खर्च करुन महाड सार्वजनिक बांधकाम  विभागाने या घाटाची दुरुस्ती केली होती. शुक्रवारी पुन्हा एकदा महाड आणि पुणे हद्दीवर वाखजई या ठिकाणी भोर सार्वजनिक बांधकाम विभाग हद्दीमध्ये घाटाचा काही भाग दरीत कोसळला आहे.

सध्या या ठिकाणी एकेरी वाहतुक सुरु असुन हा घाट धोकादायक स्थितीत आला असुन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. पावसामुळे सध्यातरी या घाटची दुरुस्ती अशक्य असुन, वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply