Breaking News

सनरायझर्स हैदराबादच्या कर्णधारपदावरून वॉर्नरला हटवण्याची मागणी

स्थानिक खेळाडूंना डावलल्याचाही आरोप

हैदराबाद : वृत्तसंस्था
2021च्या आयपीएलसाठी नुकतीच लिलावाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या लिलावानंतर हैदराबादमध्ये एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. लिलावामध्ये स्थानिक खेळाडूंकडे दुर्लक्ष केल्याने सनरायझर्स हैदराबादच्या फ्रँचायझीवर टीका होत आहे. दरम्यान, सनरायझर्सचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरवरही आरोप करण्यात आले आहेत.
तेलंगाणामधील सत्ताधारी असलेल्या तेलंगाणा राष्ट्र समितीचे आमदार आणि माजी मंत्री दानम नागेंद्र यांनी डेव्हिड वॉर्नरवर फिक्सिंगचा आरोप केला आहे. वॉर्नरवर बॉल टेम्परिंगचा आरोप झाला होता. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून दूर करण्यात यावे, अशी मागणी दानम नागेंद्र यांनी केली आहे.

Check Also

शिवराज्याभिषेक सोहळ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुवर्णकाळाचा अनुभव

पनवेल : रामप्रहर वृत्तउलवे नोडमधील रामशेठ ठाकूर मैदानावर छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या …

Leave a Reply