नवी दिल्ली ः दिल्लीत प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांनी आयोजित केलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागल्याने कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ व नांगलौईसह इतर ठिकाणच्या हिंसाचारात जखमी झालेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते कपिल मिश्रा यांनी शनिवारी (दि. 30) तिरंगा रॅलीची घोषणा केली आहे. आपल्या ट्विटरवरून त्यांनी याबाबतचे ट्विट केले. तिरंग्याचा अपमान तसेच पोलिसांवरील हल्ले आता खपवून घेतले जाणार नाहीत, अशा संदेश याद्वारे दिला जाणार आहे. शनिवारी सायंकाळी 5 वाजता सेंट्रल पार्क कनॉट प्लेसपासून ही रॅली सुरू होईल. सर्वांनी तिरंग्यासह रॅलीत सहभागी व्हावे, असे कपिल मिश्रा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या हस्ते सात कोटी 11 लाखांच्या विकासकामांचा शुभारंभ
शेकाप, उबाठाचे कार्यकर्ते भाजपमध्ये पनवेल : रामप्रहर वृत्त उरण मतदारसंघात किमानपाच हजार कोटी रुपयांचा निधी …