पनवेल ः प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीला शुक्रवार (दि. 29)पासून पनवेलमध्ये प्रारंभ होणार आहे.
पनवेल शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार्या स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे उद्घाटन सकाळी 9 वाजता अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष व सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (दि. 31) सायंकाळी 5 वाजता होणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर असून, प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध नाटककार, साहित्यिक आणि 99व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी उपस्थित राहणार आहेत. या वेळी सन्माननीय अतिथी म्हणून भाजपचे सांस्कृतिक सेल प्रदेशाध्यक्ष अॅड. शैलेश गोजमगुंडे, महापौर डॉ. कविता चौतमोल, प्रसिद्ध सिने अभिनेते संजय नार्वेकर, जयंत वाडकर, लेखक-दिग्दर्शक व प्रसिद्ध अभिनेता अद्वैत दादरकर, प्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा देशमुख, प्रसिद्ध निर्मात्या कल्पना कोठारी, प्रसिद्ध अभिनेते भरत सालवे, प्रसिद्ध दिग्दर्शक, लेखक, अभिनेते अभिजित झुंझारराव, कवी व प्रसिद्ध अभिनेते राहुल वैद्य आदी उपस्थित राहणार आहेत.
एकांकिका स्पर्धेचा जास्तीत जास्त रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पनवेल शाखेचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, उपाध्यक्ष व सभागृह नेते परेश ठाकूर, स्पर्धा सचिव व सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बर्हाटे, स्पर्धा सचिव व प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे यांनी केले आहे.
महाअंतिम फेरीतील 24 एकांकिका
दुसरा आइन्स्टाइन (सौ. नलिनी यशवंत दोडे विद्यालय, मुलुंड), विसर्जन (श्रुजन कलामंच, बोरिवली), यंदा कर्तव्य आहे (के. इ. एस कॉलेज, मुंबई), घरोट (नाट्यस्पर्श व भवन्स कॉलेज, मुंबई), वण्डरिंग बोट (एम. डी. कॉलेज, मुंबई), नातं (व्हाइट लाइट, ठाणे), स्टार (जिराफ थिएटर, मुंबई), 12 किमी (ए. एस. एम. प्रोडक्शन, मुंबई), लव्ह अॅण्ड रिलेशनशिप (आमचे आम्ही, पुणे), क्लिक (ओम साई कलामंच, वसई), आरपार (फोर्थ वॉल, ठाणे), पँडल (रिफ्लेशन थिएटर, पनवेल), लकडबगधा (दवेरथ थिएटर, डोंबिवली), आर ओके (सी. के. टी. कॉलेज, पनवेल), बारसं (कलांश थिएटर, रत्नागिरी), नंगी आवाज (कोकण ज्ञानपीठ, उरण), गुंतता (निर्मिती, वसई), भाद्रपद (कलारंग सामाजिक संस्था, अलिबाग), लॉटरी तिकीट (कला कारखाना, कांदिवली), शुद्धता गॅरेंटेड अर्थात पाणी (मॉर्निंग ड्रीम एंटरटेनमेंट, मुंबई), बेड टाइम (रूद्र प्रोडक्शन, इचलकरंजी), कुणीतरी पहिलं हवं (बी. एम. सी. सी., पुणे), बिनविरोध (रंगपंढरी, पुणे), जाळ्यातील खिळे (बोलपट, पुणे).
पारितोषिकांचे स्वरूप
प्रथम क्रमांक – 1 लाख रुपये आणि मानाचा अटल करंडक
द्वितीय क्रमांक – 50 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
तृतीय क्रमांक – 25 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
चतुर्थ क्रमांक – 10 हजार रुपये,
उत्तेजनार्थ क्रमांक – 5 हजार रुपये, प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह
तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, लेखक, संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना, उत्तेजनार्थ अशी विविध पारितोषिके.