उरण ः वार्ताहर, प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वैभव महाडिक यांनी तयार केलेल्या ‘नेटपॅक’ या ओटीटी प्लॅटफॉर्म असलेल्या अॅपच्या अनावरण सोहळ्याचे आयोजन खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयात करण्यात आले होते. या नेटपॅक अॅपचे भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व गायक नंदेश उमप यांच्या हस्ते सोमवारी (दि. 25) उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भेट देऊन पुढील यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
या वेळी एक थी बेगम फेम प्रदीप डोईफोडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेम संकेत कोर्लेकर, कंपनी डायरेक्टर प्रवीण कुठार, अभिनेत्री दीपाली जाधव, अभिनेता दिग्दर्शक वैभव सातपुते आदी उपस्थित होते.
Check Also
दिवाळी अंकांतून साहित्य क्षेत्राला नवी उंची -मंत्री आशिष शेलार
रौप्य महोत्सवी स्पर्धेचे पारितोषिक वितरण पनवेल : रामप्रहर वृत्तलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले …
RamPrahar – The Panvel Daily Paper