Breaking News

बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करा

रोहा ज्वेलर्स असोसिएशनचे मुख्याधिकार्‍यांना निवेदन

रोहे : प्रतिनिधी

शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे त्वरीत सुरू करा, अशी मागणी रोहा-कोलाड ज्वेलर्स असोसिएशनने  मंगळवारी (दि. 6) रोहा अष्टमी नगर परिषदच्या  मुख्याधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली. रोह्यात नुकतेच ज्वेलर्सचे दुकान फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडल्याने सराफा व्यावसायिकांत भितीचे वातावरण आहे. दरम्यान, रोहे नगर परिषद हद्दीतील 27 पैकी 26 सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे निदर्शनास आल्याने या व्यावसायिकांच्या चिंतेमध्ये वाढ झाली आहे. शहरातील बंद असलेले कॅमेरे लवकर सुरू करण्यात यावेत, असे  रोहा-कोलाड ज्वेलर्स असोसिएशनने रोहा नगर परिषदेच्या मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. रोहा कोलाड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष राकेश  जैन, सेक्रेटरी मनोज जैन, खजिनदार भरत जैन, वस्तीमल जैन, सौरभ पोतदार, रितेश जैन, परेश जैन, राहुल जैन यांच्यासह ज्वेलर्स बांधव मोठ्या संख्येने या वेळी उपस्थित होते.

Check Also

पिक्चर सुपर हिट; पुष्पा 2चे यश काही वेगळेच

सामाजिक, सांस्कृतिक वातावरण असे आहे की तुम्ही पुष्पा2च्या जाळ्यात सापडला आहात अथवा वावरताहात…लोकप्रियतेची जणू अक्राळविक्राळ …

Leave a Reply