पालिका आयुक्तांच्या आदेशाला दाखवली केराची टोपली
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/04/cuf-768x1024.jpg)
पनवेल : प्रतिनिधी
येथील कोझी नुक सोसायटीमध्ये उघडण्यात आलेल्या सिटीजन युनिटी फोरम (कफ)च्या अनधिकृत कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.
या कार्यालयासाठी सुरू करण्याकरिता सोसायटीची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता निवासी इमारतीमध्ये चालू करण्यात आले. याची कोझीनुक सोसायटीच्या सदस्यांनी फोरमला नोटीस देऊन मनपा आयुक्तांना निवेदनही सादर केले होते. त्यावर पालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हे कार्यालय अनधिकृत असून त्याचे उद्घाटन होऊ न देता, तत्काळ त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. परंतु नोटीस बजावूनही फोरमने त्या आदेशाला केराची
टोपली दाखवली.
सिटीजन युनिटी फोरमचेच काही सदस्य हे पनवेल महापालिकेने स्थापित केलेल्या एनजीओ ग्रुपचे सदस्यही आहेत आणि त्यांनीच पालिका आयुक्तांचा स्पष्ट आदेश धुडकावून जाहीर उद्घाटन समारंभ मोठ्या दिमाखात साजरा केला. आता पनवेल महापालिका कफवर काय कारवाई करणार याकडे तेथील स्थानिक राहिवाशांचे लक्ष लागले आहे.