Friday , September 22 2023

शेकाप कार्यकर्ते शिवसेनेत दाखल

उरण : वार्ताहर

खालापूर येथील मोहपाडा खांबे गावातील शेतकरी कामगार पक्ष व राष्ट्रवादीचे सुनील गोंधळी किरण टवळे, योगेश हसुराम कुरंगळे, सचिन काशिनाथ कुरंगळे, चंद्रकांत म्हात्रे, सुनील कंरगुळे, हसुराम कुरंगुळे, दीपक गोंधळी, सुनील कुरंंगळे, हितेंद्र माळी, आकाश कुरंगुळे, कुणाल कुरंंगळे, मयुर डुकरे, रोशन गोंधळी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

शिवसेना रायगड  जिल्हाप्रमुख आमदार मनोहर  भोईर यांच्या उरण येथील जनसंपर्क कार्यालयात हा पक्ष प्रवेश सोहळा झाला. शिवसेना जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे व विभाग प्रमुख अजित सावंत यांच्या प्रयत्नाने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांनी प्रवेशकर्त्यांच्या हाती भगवा झेंडा हाती देत त्यांचे स्वागत केले. ज्या विश्वासाने आपण शिवसेनेत प्रवेश केला आहात त्याला कधीही तडा जाणार नाही, अशी ग्वाही जिल्हाप्रमुख आमदार मनोहरशेठ भोईर यांनी दिली. या वेळी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे व विभाग प्रमुख अजित सावंत व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

खारघरमध्ये भाजपतर्फे सिग्नलचे लोकार्पण

खारघर ः रामप्रहर वृत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73वा वाढदिवस देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून …

Leave a Reply