
उरण : वार्ताहर
पनवेल तालुक्यातील मानघर-मोसारे येथील श्री स्वामी समर्थ प्रकटदिन महोत्सव व आठवा वर्धापन दिन रविवारी (दि. 7) मानघर-मोसारा येथील स्वामी समर्थ मठ मंदिरात उत्साहात होणार आहे.
सकाळी 6 ते 7 स्वामी चरण पादुका व मूर्ती अभिषेक समस्त देवता पूजन सोहळा, सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालणार आहे. या सोहळ्यात भजन, आरती, अखंड भंडारा, सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत हेल्पेज इंडिया आणि ओएनजीसी पनवेल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य तपासणी व औषध वाटप, मोफत डोळे तपासणी, इएचआय हॉस्पिटल, सानपाडा यांच्या सौजन्याने आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.सायंकाळी 7 वाजता श्री स्वामी समर्थ पालखी सोहळा होणार आहे व रात्री 8 ते 11 वाजता मराठी अस्मिता जपणारा मराठमोळ्या संगीताने नटलेल्या नृत्यमय महाआविष्कार महाराष्ट्र गाथा कार्यक्रम होणार आहे.