मोहोपाडा : प्रतिनिधी
असोसिएशन ऑफ रायगड कुंग फू आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कुंग फू यांच्या माध्यमातून 14व्या राज्यस्तरीय कुंग फू स्पर्धेचे आयोजन नुकतेच जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनीतील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालयात करण्यात आले होते. या स्पर्धेत पुणे जिल्ह्याने विजेतेपद पटकाविले. द्वितीय क्रमांक रायगड जिल्ह्याने आणि तृतीय क्रमांक ठाणे जिल्ह्याने प्राप्त केला.
या स्पर्धेचे उद्घाटन सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. डी. बर्हाटे यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत वेगवेगळ्या जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी भाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विजेत्यांना आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. या वेळी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
स्पर्धेचे नियोजन असोसिएशन ऑफ रायगड कुंग फुचे सेक्रेटरी भूपेंद्र गायकवाड आणि असोसिएशन ऑफ महाराष्ट्र कुंग फु यांनी केले होते.