म्हसळ्यात तटकरेंच्या भ्रष्टाचारावर जहरी टीका

म्हसळा : प्रतिनिधी
महायुतीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी म्हसळा येथील श्री धावीरदेव पटांगणात झालेल्या सभेत गीतेंसह सर्वच वक्त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार सुनिल तटकरे यांच्यावर जहरी टिका केली.
या निवडणुकीत भ्रष्टाचारी सापाला रायगडचा मतदार ठेचणार असल्याचा गीते यांनी सांगितले. या वेळी कृष्णा कोबनाक, नाविद अंतुले, सुलतान मुकादम, उस्मान रोहेकर, संजय कोनकर यांनी तटकरे यांच्या भ्रष्टाचाराचा पर्दापाश केला. शेकडो एकर जमीन खरेदी, बोगस कंपन्या, मनी लेडींग, माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुलेंच्या पाठीत खंजीर खुपसणारा, विश्वासघातकी असा उल्लेख करुन या वक्त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर जहरी टिका केली.
या वेळी जिल्हाप्रमुख रवि मुंडे, भाजपाचे उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक, माजी आ. तुकाराम सुर्वे, श्रीमती करंजे, सरोज म्हशीलकर, नाविदभाई अंतुले, संजय कोनकर, महादेव पाटील, सुलतान मुकादम, उस्मान रोहेकर, नंदू शिर्के यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भष्ट्राचार विरुध्द सदाचार याच प्रमुख मुद्दावर या वेळी रायगड मतदार संघाची लोकसभा निवडणुक होणार आहे. आमची महायुती घट्ट आहे, अलिबाग, पेण व श्रीवर्धन विधानसभा क्षेत्रात प्रत्येकी 10 सभा झाल्या. कार्यकर्त्यांत उत्साह आहे. यावेळी प्रचंड मताधिक्क्याने विजय माझाच विजय होणार.
-अनंत गीते, उमेदवार, महायुती, रायगड