Breaking News

खोपोली भाजपतर्फे सामाजिक न्याय पंधरवड्यानिमित्त उपक्रम

खोपोली ः प्रतिनिधी

केंद्र शासन, पंतप्रधान नरेंद्र मोदी व बालकल्याण विभाग यांच्यातर्फे भारतात कुपोषित बालकांची संख्या कमी होण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून केंद्र शासन प्रयत्नशील आहे. त्यातील प्रमुख अंगणवाडीतील बालकांना पोषणमूल्य आहार देण्यासंदर्भात हा कार्यक्रम रायगड जिल्ह्यात भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा उमा खापरे यांच्या आदेशानुसार महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्ष अश्विनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात राबविण्यात आला. या पार्श्वभूमीवर खोपोली शहरातील ठाकूरवाडी बालवाडीत कार्यक्रम मंगळवारी (दि. 19)शहर महिला मोर्चाच्या वतीने झाला. या कार्यक्रमास जिल्हा महिला मोर्चाच्या अध्यक्ष अश्विनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच शहर महिला मोर्चा सरचिटणीस अश्विनी अत्रे, सुमिता महर्षी, गीता मोहिते, अनिता शहा, खोपोली भाजप सरचिटणीस हेमंत नांदे, प्रमोद पिंगळे, चिटणीस गोपाळ बावस्कर, वैद्यकीय सेलचे विकास घोरपडे आदींसह अनेक कार्यकर्ते, पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी 50 विद्यार्थ्यांना पोषण आहारांतर्गत फळांचे वाटप करण्यात आले.

 

खेड्यापाड्यातील शाळांतील कुपोषित बालकांना पोषण आहार देऊन भावी पिढी सुदृढ बनविणे यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र शासन प्रयत्नशील आहे व त्याचाच भाग म्हणून हा कार्यक्रम देशभरात संपन्न होत आहे.

-अश्विर्नी पाटील, अध्यक्ष, जिल्हा महिला मोर्चा, भाजप

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply