Breaking News

प्रलंबित वेतनासाठी पेणमध्ये एसटी कामगार संघटनेचे आत्मक्लेश उपोषण

पेण : प्रतिनिधी

प्रलंबित वेतन त्वरित मिळावे व एसटी कामगारांना दरमहा देय तारखेला पूर्ण वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी (दि. 9) पेण रामवाडी येथील एसटी विभागीय कार्यालयासमोर एक दिवसीय आत्मक्लेश उपोषण करण्यात आले.

एसटी कामगारांचे प्रलंबीत तीन महिन्याचे वेतन 7 ऑक्टोंबरपर्यंत न मिळाल्यास संघटनेचे पदाधिकारी शुक्रवारी विभागीय कार्यालयासमोर आत्मक्लेश उपोषण करतील, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व केंद्रीय अध्यक्ष संदीप शिंदे यांनी राज्याचे परिवहन मंत्रीम एसटीचे व्यवस्थापकीय संचालक व एसटी महामंडळ यांना पत्राद्वारे दिला होता. त्यानुसार प्रलंबित असलेले ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन त्वरित मिळावे आणि दरमहा मिळणारे वेतन देय तारखेलाच देण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी राज्यभर आत्मक्लेश उपोषण करण्यात येत असल्याचे यावेळी विभागीय अध्यक्ष विलास खोपडे यांनी सांगितले.

यावेळी विभागीय अध्यक्ष विलास खोपटे, सचिव गणेश शेलार, केंद्रीय उपाध्यक्ष आशा घोलप, कार्याध्यक्ष दिपक शेडगे, संघटना सचिव तुलशिदास पाटील, चंद्रशेखर देव, बाळू बांगर, नकुल पाटील, सायली वाणी, श्रीकृष्ण भावे यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी व सदस्य उपोषणात सहभागी झाले होते.

लॉकडाऊनच्या काळात एस टी महामंडळाचे उत्पन्न घटले होते, मात्र आता प्रवाशी वाहतूक सुरळीतपणे होत असल्याने एसटी कामगारांचे वेतन लवकरच अदा करण्यात येईल.

-अनघा बारटक्के, विभागीय अधिकारी, विभागीय एसटी कार्यालय, रामवाडी-पेण

Check Also

केंद्र सरकार पाच वर्ष टिकेल -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत ः प्रतिनिधी मला या निवडणुकीत खूप काही शिकता आले. विरोधकांनी जाती जातीत तेढ निर्माण …

Leave a Reply