खारघर-तळोजा मंडलकडून महावितरणचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त
महावितरणाने 75 लाख वीज ग्राहकांना कनेक्शन तोडण्याची नोटीस पाठवून महाराष्ट्रातील चार कोटी जनतेला अंधारात टाकण्याचे दुष्कृत्य केलेले आहे. याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्ष खारघर-तळोजा मंडलाकडून महावितरणविरोधात टाळे ठोको व हल्लाबोल आंदोलन व निषेध करण्यात आला.
या वेळी मंडलमधील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने या निषेध मोर्च्यात सहभागी झाले होते. यामध्ये खारघर-तळोजा मंडलाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, प्रभाग समिती ‘अ’ सभापती अनिता पाटील, माजी सभापती अभिमन्यू पाटील, माजी सभापती शत्रुघ्न काकडे, नगरसेवक हरीश केणी, रामजीभाई बेरा, आरती नवघरे, हर्षदा उपाध्याय, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे, युवा अध्यक्ष विनोद घरत, चिटणीस गीता चौधरी, संध्या शारबीद्रे, सोशल मीडिया प्रदेश सदस्या चांदणी अवघडे, समीर कदम, उपाध्यक्ष संजय घरत, निर्दोष केणी, बिना गोगरी, गुरू ठाकूर, प्रभाकर बांगर, लखविरसिंग सैनी, अमर उपाध्याय, प्रशांत दुदाम, श्यामला सुरेश, वासुदेव पाटील, सचिन वासकर, जयदास तेलवणे, अरविंद जाधव, अॅड. राजेंद्र अग्रवाल, मुनाफ पटेल, स्नेहल बुधाई, क्रीस्तिना, विपुल चौतालिया, एस. के. डोळस, शिवाजी पिंपरे, भीमा मेस्त्री, नंदू दळवी, संदीप एकबोटे, शफी पटेल, रामचंद्र जाधव, नवनीत मारू, रुपेश चव्हाण, वैशाली प्रजापती, विलास निकम, कृष्णा खडगी, मुकेश अग्रवाल, आर.के. दिवाकर आदी उपस्थित होते.