Breaking News

काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का?

भाजप नेते आशिष शेलारांचा सवालवजा टोला

मुंबई : प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा सन्मान केला त्या व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्रद्रोह का करतेय, असा सवाल भाजप नेते आशिष शेलार यांनी केला आहे. काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा चक्काजाम झालाय का? असा टोलाही त्यांनी लगावला.

शेलार यांनी ट्विटद्वारे आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, देशांतर्गत विषयात उगाच ढवळाढवळ करणार्‍या रिहाना, ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा या परदेशी सेलिब्रेटिंच्या तालावर काँग्रेस-शिवसेनेने ‘पॉप डान्स’ केला, तर या परदेशी सेलिब्रेटिंना सचिन तेंडुलकर, लतादीदींनी खडसावले. अण्णा हजारेंनी लोकशाहीचा सन्मान केल्यावर त्यांच्याविरोधात धिंगाणा घातला.

वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यांचा प्रचंड सन्मान केला त्या भारतरत्न, महाराष्ट्रभूषण व्यक्तींवर शिवसेना शिंतोडे उडवून महाराष्ट्र द्रोह का करतेय? काँग्रेससोबत जाऊन शिवसेनेच्या बुद्धीचा ‘चक्काजाम’ झालाय? सत्तेसाठी महाराष्ट्र धर्मावर ‘ट्रॅक्टर’ फिरवणार का, असे अनेक प्रश्नही शेलार यांनी शिवसेनेला विचारले आहेत.

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply