Breaking News

माणगावातील बेकायदेशीर बांधकामे जमीनदोस्त

महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर महामार्ग प्राधिकरणाची कारवाई

माणगाव : प्रतिनिधी

येथील मुंबई – गोवा महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी बेकायेशीर बांधकामे केली होती. महामार्ग प्राधिकरण अधिकार्‍यांनी ही बांधकामे शनिवारी (दि. 6) जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त केली.

माणगाव शहरातून मुंबई-गोवा महामार्ग जातो. या महामार्गालगत मच्छी विक्रेत्यांनी केलेल्या बेकायेशीर बांधकामाबाबत येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहीत याचिका दाखल केली होती. त्या प्रकरणावर न्यायालयाने ही अतिक्रमणे हटविण्याचे आदेश महामार्ग प्राधिकरणाला दिले होते. त्यानुसार प्राधिकरणाने महामार्ग हद्दीलगत सरकारी जागेमध्ये विना परवानगी व्यावसाय, बांधकाम करणार्‍या मच्छी विक्रेत्यांना आगाऊ नोटीस दिली होती. मात्र संंबंधितांनी अतिक्रमण हटविले नाही. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग महाड उपविभागाचे शाखा अभियंता रवींद्र भोये आणि सहाय्यक कार्यकारी अभियंता आकांक्षा मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी ही अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली.

या वेळी माणगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कांदेकर, पोलीस नाईक सुनील शिरसाट, अनिल वडते, महिला पोलीस नाईक कुंदन जाधव, हवालदार श्री. म्हात्रे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान, येथील मच्छी विक्रेत्यांनी  लेखी अर्ज देऊन नगरपंचायतीने आम्हांला भाडेतत्वावर गाळे उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply