Breaking News

कामोठे येथील नागरी आरोग्य केंद्रात वैद्यकिय सेवांचे उद्घाटन

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर

पनवेल महापालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने कामोठे येथील नागरी आरोग्य केंद्र, तेरणा वैद्यकिय महाविद्यालय आणि महापालिका यांच्या संयुक्त विद्यमानातून सुरू करण्यात आले आहे. त्यामधील विविध आरोग्य सुविधांचे उद्घाटन गुरुवारी (दि. 11) महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले.

पनवेल महापालिकेच्या आरोग्य सेवेचे सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीने कामोठे येथील नागरी आरोग्य केंद्र याठिकाणी तेरणा वैद्यकिय महाविद्यालय आणि महापालिका यांच्य संयुक्त विद्यमानातून स्त्री रोग, बालचिकित्सा, त्वचारोग, अस्थी व्यंग चिकित्सा, फिजि ओथेरपी, नेत्र चिकित्सा, औषधे, शस्त्रक्रिया अशा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

उद्घाटनावेळी डॉ. कविता चौतमोल म्हणाल्या की, कोरोनावर मात करण्याच्या प्रयत्नात पनवेल महापालिका यशस्वी होत आहे. भविष्यात येणार्‍या रोगांवर मात करण्यासाठी वैद्यकिय सेवा बळकट करणे गरजेचे आहे.

आयुक्त सुधाकर देशमुख म्हणाले की, गोरगरीबांना कमी खर्चात उपचार मिळावेत यासाठी महानगरपालिका बाहेरच्या संस्थांना सोबत घेऊन चांगल्या सुविधा देत आहेत. तेरणाने यामध्ये सकारात्मक सहभाग घेतला आहे. पुढे जाऊन तेरणा आणि मनपाचे घट्ट नाते निर्माण होईल.

या कार्यक्रमाच्या वेळी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख, तेरणा वैद्यकिय महाविद्यालयाचे विश्वस्त मल्हार पाटील, सीईओ डॉ. पी. टी. देशमुख, डीन डॉ. सुनिल पेटकर, नमन गर्ग, डॉ. पद्मजा कांची, डॉ. राहुल दांडेकर, नगरसेवक अरूणकुमार भगत, नगरसेविका संतोषी तुपे, नगरसेविका अरुणा भगत, मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. लोहारे, डॉ. रेहाना मुजावर आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि तेरणा महाविद्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply