Breaking News

महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय कुवल्यानंद योग पुरस्काराने सन्मानित

पनवेल ः वार्ताहर

पोलीस विभागात करीत असलेले प्रामाणिक कर्तव्य तसेच योगाचा प्रचार व संवर्धनाचे काम करणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक (वाहतूक) डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना लोणावळा येथील कैवल्यधाम येथे आयोजित सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते कुवल्यानंद योग पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

या वेळी कैवल्यधामचे अध्यक्ष स्वामी महेशानंद, सरचिटणीस ओ. पी. तिवारी, सहसंचालक (संशोधन) रणजितसिंह भोगल, मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी आदी उपस्थित होते. डॉ. भूषणकुमार उपाध्याय संस्कृतचे गाढे अभ्यासक असून त्यांनी लिहिलेली काही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी मानवतेला केंद्रस्थानी ठेवून पोलीस दलात काम केले. पोलीस दलातील हुशार, विद्वान, शांत, प्रेमळ अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ते महामार्ग (वाहतूक) पोलीस विभागाचे अपर पोलीस महासंचालक आहेत. वाहतूक विभागामधील अपघातांचे प्रमाण कमी होण्यासाठी वाहतूक दलातील अधिकार्‍यांना आवश्यक ते मार्गदर्शन करून राज्यभर वेगवेगळ्या योजना ते राबवत असतात. डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून सोलापुरातील पंढरपूर येथून सेवेचा प्रारंभ केला. डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना कुवल्यानंद योग पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्यावर महामार्ग वाहतूक पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply