Breaking News

कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लबचा वर्धापन दिन

कर्जत : प्रतिनिधी

कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लब संस्थेचा 16वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कर्जत भ्रमण मंडळ हास्य क्लब व्यासपीठावर प्रमुख पाहुणे निलेश चौडीया, मंडळाचे अध्यक्ष मुकुंद मित्रगोत्री, कार्याध्यक्ष मधुकर घरत, कोषाध्यक्ष जयेश शहा, माजी अध्यक्ष रामकृष्ण मोकल हे होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्रीगणेशाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून गतवर्षी दिवंगत झालेले मंडळाचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 

मित्रगोत्री यांच्या हस्ते प्रमुख पाहुणे चौडीया यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात मंडळाच्या गतवर्षीच्या कामाचे अहवाल वाचन मंडळाचे सचिव सुहास प्रधान यांनी केले. जमाखर्चाचे वाचन कोषाध्यक्ष शहा यांनी केले. या कार्यक्रमात विविध प्रकारचे खेळ, करमणुकीचे कार्यक्रम घेण्यात आले. सर्व सदस्यांनी त्यात सहभाग घेऊन आनंद साजरा केला. मंडळाचे कार्यकारिणी सदस्य मुकुंद भागवत यांनी उल्हास नदी प्रदूषणमुक्त व शून्य कचरा अभियानाबाबत माहिती दिली. रमेश खैरे, मुकुंद टुमणे, सविता जोशी या सदस्यांनी हास्य क्लबबाबत आपले मनोगत व्यक्त कले व हास्य क्लबमुळे होणारे फायदे सांगितले. भ्रमण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य भरत शहा व छगन ओसवाल यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रधान यांनी केले. उपस्थित सर्व सदस्यांनी त्यांच्यावर हास्य पुष्पवृष्टी करून दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी सूर्यकांत शहा, सुरेखा प्रधान, शीला घरत, संगीता गोडबोले, शर्मिला नारकर, माधवी मित्रगोत्री आदी उपस्थित होते.

Check Also

केरळ विधानसभा निवडणुकीसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून भाजपचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तकेरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणनीती आखली असून कासरगोड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी …

Leave a Reply