पनवेल ः रामप्रहर वृत्त
मिडलक्लास सोसायटीच्या मैदानावर सुरू असलेल्या टीआयपीएल ज्युनिअर पनवेल प्रीमियर लीगच्या दुसर्या दिवशी फ्युचर स्टार क्रिकेट क्लिनिक (एफएससीसी) आणि रॉकविला फायटर्स या संघांनी विजयाची नोंद केली.
पहिला सामना एफएससीसी विरुद्ध प्रतीक क्रिकेट अकॅडमी (पीसीए) असा झाला. यामध्ये पीसीएने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले. एफएससीसी संघाने फलंदाजी करीत 155 धावा केल्या. या संघाकडून शिवराज जगतापने 51 धावा काढल्या, तर पीसीए संघाकडून अर्णव साळवीने तीन गडी बाद केले. 155 धावांचा पाठलाग करताना पीसीए फक्त 123 धावा करू शकले. एफएससीसी संघाकडून आकाश सेठीने तीन षटकांमध्ये अवघ्या नऊ धावा देत दोन गडी बाद केले.
दुपारच्या सत्रातील सामन्यात मॉर्निंग पंटर्सने प्रतिस्पर्धी रॉकविला फायटर्स संघाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निवडले होते. फलंदाजी करताना रॉकविला फायटर्स संघाने 191 धावा केल्या. या संघाकडून स्वराज गोवारीने 39 धावांची
खेळी केली. आव्हानाचा पाठलाग करताना मॉर्निंग पंटर्स 184 धावांपर्यंतच मजल मारू शकले. या संघाकडून यश पुंडेने 54 आणि सक्षम सिंहने 49 धावांचे योगदान दिले.
Check Also
वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …
RamPrahar – The Panvel Daily Paper