Sunday , October 1 2023
Breaking News

डंपरची एसटी बसला धडक; सात प्रवासी जखमी

नागोठणे : प्रतिनिधी : भरधाव वेगात उलट दिशेला येऊन समोरून येणार्‍या एसटी बसला डंपरने जोरदार धडक दिल्याने बसमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. सदर अपघात शनिवारी (दि. 6) सायंकाळी मुंबई-गोवा महामार्गावर निडी पुलावर घडला. श्रीवर्धन आगाराची बस (एमएच 20, बीएल 2914) कोलमांडलाहून मुंबईकडे, तर डंपर (एमएच 04, जीएफ 241) मुंबई बाजूकडून नागोठणेकडे येत होता. अपघातात रमेश रटाटे, रमिला रटाटे, मंगला जाधव, रणजित करंजकर, नारायण पाटील, शशिकांत पाटील आणि अर्चना करंजकर हे श्रीवर्धन तालुक्यातील विविध गावांमधील सात प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. याप्रकरणी डंपर चालक रामआसरे वर्मा (रा. शिवडी, मुंबई) याच्या विरोधात नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, हेड कॉन्स्टेबल श्रीकांत म्हात्रे पुढील तपास करीत आहेत.

Check Also

रायगडात अन्न व औषध प्रशासनाचे धाडसत्र

26 लाख 81 हजारांच्या माल जप्त; परवाना रद्दचीही कारवाई पेण ः प्रतिनिधी गणेशोत्सवादरम्यान सर्व पदार्थ …

Leave a Reply