Breaking News

हिंदुत्व जीवनपद्धती सर्वश्रेष्ठ!

मुरूड : प्रतिनिधी : सनातन वैदिक हिंदु धर्म ही केवळ उपासना पद्धती नसून प्रकृती व संस्कृती यांचा एक अनोखा संगम आहे. हिंदु धर्मामध्ये कोणी एक संस्थापक नाही, वा एक ग्रंथ नाही की एक देव नाही.  वसुधैव कुटुम्बकम ही धारणा असलेली जगाच्या पाठीवर एकमेव हिंदुत्व जीवनपद्धती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांताचे सहकार्यवाह विठ्ठलराव कांबळे यांनी शनिवारी (दि. 6) येथे केले. मुरूड तालुका रा. स्व. संघ चोरढे मंडळातर्फे शनिवारी शिरगाव येथे आयोजित केलेल्या वर्षप्रतिपदा उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून विठ्ठलराव कांबळे स्वयंसेवकांना मार्गदर्शन करीत होते. सर्वप्रथम आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना स्वयंसेवकांनी अभिवादन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. अ‍ॅड. नरेश घाग, मुरूड तालुका संघचालक दिलीप जोशी, तालुका कार्यवाह समीर उपाध्ये, प्रा. अनुपसिंह रणवीर सिंह, महेंद्र पाटील, जगदिश पाटील आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या भाषणात कांबळे म्हणाले की, रा. स्व. संघाचे कार्य भारतासह सुमारे 45 देशांमध्ये सुरू असून, भारत देश परमवैभवाला नेण्याचे अंतिम लक्ष्य आहे. देवदुर्लभ कार्यकर्ते, सज्जन शक्तीचे संघटन करून व्यक्ती-व्यक्तीला जोडण्याचे काम संघाच्या यंत्रणेतून 94 वर्षे अथकपणे सुरू आहे.

भारत हा लोकशाही मानणारा सर्वात मोठा देश आहे. संविधानानुसार आगामी निवडणुकीत उभे असलेले सर्वच आपले बांधव आहेत. मत कोणालाही द्या, मात्र मतदानाचा पवित्र हक्क या देशातील तमाम मतदारांनी बजावावा. -विठ्ठलराव कांबळे, सहकार्यवाह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोकण प्रांत

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply